सेवानिवृत्तीच्या 1 महिना आधीच तलाठ्याला लाच घेताना अटक;

 सेवानिवृत्तीच्या 1 महिना आधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; 

■ वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक.

बुलढाणा -
 सरकारी नोकरीत लागण्यापूर्वी आपण शेतकऱ्याची (Farmer) पोरं म्हणून भूषणावह सांगणारे, जेव्हा सरकारी अधिकारी बनतात तेव्हा शेतकऱ्यांनाच वेठीस धरतात असे अनेकदा पाहायला मिळालं आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करुन त्यांना विविध कामासाठी पैशांची मागणी होत असते. काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक आणि महसूल कर्मचारी लाच (Bribe) घेताना अटक करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. आता, बुलढाणा जिल्ह्यातही एका तलाठ्यासह महसूल कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रावसाहेब काकडे असे तलाठी महाशयांचे नाव आहे, विशेष म्हणजे पुढच्याच महिन्यात त्यांची सेवानिवृत्ती होणार होती. मात्र, तत्पूर्वीच एसीबीने (ACB) अटक केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.