अमरावतीकर उद्योजकांसाठी संधी: 26 जून रोजी उद्योजक मेळावा

अमरावतीकर उद्योजकांसाठी संधी: 26 जून रोजी उद्योजक मेळावा
 अमरावती -
व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ‍‘दे आसरा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ए. वि. थिएटर (सभागृह), मराठी विभागात होणार आहे.

               या मेळाव्यात पुणे येथील मॅनेजमेंट थियाट्रिक्स, स्टिम्युलेटर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि कन्सल्टंट डॉ. रवींद्र आहेर मार्गदर्शन करणार आहेत. अमरावतीचे युवा उद्योजक आणि ईसीई इंडिया एनर्जीज प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक अमित आरोकर यांची विशेष मुलाखत घेण्यात येणार आहे, ज्यातून त्यांच्या यशस्वी उद्योजकतेचा प्रवास उलगडेल.

या उद्योजक मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला मोफत उद्यम प्रमाणपत्र काढून मिळणार आहे, जो त्यांच्या व्यवसायासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.

अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. उपस्थिती नोंदवण्यासाठी https://forms.gle/vnbzshL8h7varWqU6 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. कोणत्याही अडचणीसाठी 9730862870 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.