धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
▪वैद्यकीय प्रशासनात खळबळ
▪प्रकरणात सावरासावर व चोरांच्या उलट्या बोंबाचा प्रकार
अमरावती -
धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर येताच येथील वैद्यकीय प्रशासन खळबळून जागे झाले असून डॉक्टरांची दुकानदारी, रुग्णांची गैरसोय व औषधांचा तुटवडा इत्यादी विषय जगजाहीर असताना त्या डॉक्टरांकडून सदर गंभीर प्रकरणात पांघरून घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. एप्रिलवमेयादोन महिन्यातच बरेचदा येथील भर्ती रुग्णांना अंधारात रात्र काढावी लागली. तरीसुद्धा रुग्णालयाचे जनरेटर मात्र बंद होते. दरम्यान भिल्ली येथील एका प्रसूत महिलेला संदर्भसेवा देऊन यवतमाळ पाठवण्यात आले; परंतु बेजबाबदरपणे संबंधित डॉक्टरांनी
त्यांना गरोदर मातांसाठी १०२ ची मोफत शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. अखेर कुटुंबियांनी स्वखर्चाने त्या गरोदर मातेला यवतमाळ येथील रुग्णालयात नेले. असंसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध लावण्यासाठी एनसीडीच्या डॉक्टरांची नेमणूक रुग्णालयात आहे. ग्रामीण भागातून आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब जनता अॅलर्जी, पोषक तत्त्वांची कमतरता, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, कर्करोग इत्यादी आजारावर
उपचार व औषधींसाठी ग्रामीण रुग्णालयात येतातः मात्र या विभागातील डॉक्टर त्यांच्या कर्तव्याव्यतिरिक्त मुख्य डॉक्टरांच्या गुलामगिरीत वेळ घालवतात. या विभागात वयोवृद्ध रक्तदाब व मधुमेही रुग्णांना उद्धट वागणूक दिली जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाहेर दुकाने थाटली असल्याने येथील विविध योजनांमध्ये कार्यरत डॉक्टरांचा गैरफायदा येथील एमबीबीएस डॉक्टर घेतात, यात शंका नाही; मात्र यापलीकडे स्वतःची कामे
राज्यातील नागरिकांना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी अत्याधुनिक दर्जाच्या विविध योजना उभारून सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत; मात्र शहरात ग्रामीण रुग्णलयाच्या भोंगळ कारभाराने वैद्यकीय प्रशासनावर बदनामी ओढवली आहे.
उरकविण्यासाठी रुग्णालयाशी संबंध नसलेल्या अर्धशिक्षित भाडोत्री महिला डॉक्टरांचासुद्धा उपयोग येथील डॉक्टर घेतात, हे जगजाहीर आहे. त्यातील एका डॉक्टर रुग्णालयाच्या साहित्याचा सुद्धा खाजगी दवाखान्यात वापर करीत असल्याचे बोलले जात आहे.