■ शहर भरोसा सेलसह दामिनी पथकाची कारवाई
अमरावती -
अमरावती शहर पोलिस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात येणार्या शहरातील विविध ठिकाणी अश्लिल चाळे करताना पोलिसांनी १३ युवक व युवतींना रंगेहात अटक केली.
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, मुख्यालयातील पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीत भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे, महिला पोलिस पूजा सपकाळ, हे दामिनी पथकासह गस्त करीत होते. तेव्हा त्यांना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बर्गर लॅन्ड, फ्युजन बाईट, कॅफे व छत्री तलाव परिसरात युवक व युवतींचे अश्लिल चाळे चालतात अशी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्या ठिकाणी धाड टाकून १३ युवक, युवतींना रंगेहात पकडले व महाराष्ट्र पोलिस प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करून त्यांना पालकांच्या सुपूर्द करण्यात आले.
पोलिस आयुक्तालय अमरावती शहर कार्यक्षेत्रातील महिलांना व विद्यार्थी तसेच बालकांना कुठल्याही प्रकारे छेडछाड, चिडीमारी व रोडरोमियोपासून त्रास होत असल्यास निर्भय होऊन हेल्पलाईन क्रमाकः ११२, १०९१,१०९८ यावर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छेडछाड, चिडीमारी, रोडरोमियो व इतर गैरप्रकार आढळून आल्यास सबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी कळविले आहे.