मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात
शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
अमरावती -
मागासवर्गीय मुलींसाठी असलेल्या विविध शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन, अव्यावसायिक महाविद्यालयीन आणि व्यावसायिक महाविद्यालयीन विभागातील इच्छुक विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्र. 4, जेल रोड, अमरावती, मागासवर्गीय गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कॅम्प रोड, अमरावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुलींचे शासकीय वसतिगृह, विलासनगर, राम लक्ष्मण संकुल, अमरावती या वसतिगृहांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, तो अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. या प्रिंटेड अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहात जमा करावी लागतील. अधिक माहितीसाठी, विद्यार्थिनींनी संबंधित वसतिगृहांशी संपर्क साधावा किंवा दिलेल्या पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.