अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहारचे धामणगाव रेल्वे बंदला नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद

अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहारचे  धामणगाव रेल्वे बंदला नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद 


अमरावती -

बच्चू कडु यांच्या शेतकरी कर्ज माफी सहित १७  विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार ने धामणगाव बंद चे आवाहन केले होते. त्यास उत्सुर्त प्रतिसाद मिळाला असून प्रहार चे जिल्हाअध्यक्ष प्रवीण हेंडवे यांच्या नेतृत्वात सरकार विरोधात स्थानिक शास्त्री चौक येथे निदर्शने झाली. 
बच्चू कडू यांच मोझरी येथे  ५ दिवसापासून अन्नत्याग सुरू असून त्या आंदोलनाचे लोन आता संपूर्ण राज्यभर पसरले आहेत. राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन अन मोर्चे सुरू असून राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचा बच्चू कडु यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला वाढता पाठींबा बघता सरकार ला बच्चु कडू च हे आंदोलन जड जाईल हे दिसून येते.
आजच्या या बंद आणि निदर्शना ला जिल्हाध्यक्ष प्रविण हेंडवे, तालुकाध्यक्ष सूरज गंथडे, निलेश जयसिंगपुरे, अमर गायधने,प्रशांत थोटे, शैलेश टाले, अक्षय धोपटे, प्रवीण रोहनकर, सुधाकर बर्डे, छोटू काकडे, नागेश सोनोने, दीपक पारखंडे, बंडू भोयर, विजय वानखडे, शेख अमीर, राजू नांदुरकर, निखिल मिसाळ, स्वप्निल जायले, अमर काकडे, संदीप धांदे, नितीन  हिंगे,दानिश पठाण,प्रणय डावरे, फिरोज पठाण, आशु नरुले, सौरभ वानखडे, किशोर जाधव, संतोष तुमसरे, पंकज काळे प्रहार चे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित होते.