घुईखेड जवळ एक ट्रक अपघातात चालक फसला
महामार्ग पोलिस व नागरिकांचे मदतीने काढले ट्रक चालकास बाहेर
■ नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग केव्हा होणार खड्डेमुक्त
धामणगाव रेल्वे -
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे हद्दित येणार्या घुईखेड गावा जवळ रस्त्याने वाहतुक करत असतांना एक ट्रक अपघात ग्रस्त होऊन सदरचे ट्रक मध्ये चालक फसला होता.
याबाबत देवगाव महामार्ग पोलिस पथक प्रमुख स.पो.नि.विशाल पोळकर यांना माहिती मिळताच महामार्ग वाहतुक पोलिस पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचुन स्थानिक नागरिक व उपस्थितांचे मदतीने जवळ पास 5 ते 6 तासाच्या अविरत प्रयत्ना नंतर गॅस कटर सह इतर साहित्याची जुळवा जुळव करून ट्रक चालकास बाहेर काढण्यत यश आले अपघास्त वाहनाचे चालकास लगेच पुढील उपचारासाठी रुग्नालयात भरती करण्यात आले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहाणी झाली नाही.
दरम्यान महामार्ग पोलिस पथकाने रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली होती,
या महामार्गावर सर्वाधिक खड्डे असल्यामुळे अपघातप्रवण झालेला हा नागपूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करुन सुद्धा खड्डे पडलेच दिसतात सदर कामाची जबाबदारी भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आहे.
या २८५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीकरिता ८४.१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागपूर-औरंगाबाद-सिन्नर-घोटी-मुंबई या ७५३-सी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती १८ वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने केली.
त्यानंतर शासनाने दोन वर्षांपूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. एकीकडे नागपूरहून मुंबईला जाणारा नागपूर-मुंबई क्रमांक ६ हा राष्ट्रीय महामार्ग अमरावती अकोला खामगाव पर्यंत अद्यापही नादुरुस्त आहे.
त्यात रस्त्याने टोल अधिक पडत असल्यामुळे सर्वाधिक जड वाहतूक ही नागपूर-औरंगाबाद या महामार्गााने होते, नव्हे तर ती या मार्गाने वळविली गेली.
त्यामुळे रस्त्यावर अधिक खड्डे पडले. त्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली. आतापर्यंत दीडशेच्या आसपास लोकांना खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागले. या रस्त्यावरील वाढत्या अपघातांमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी हा महामार्ग भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सोपविला आहे. हे विशेष आहे