माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नोंदणी करावी
अमरावती-
दि. 5 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांची नावे मागविण्यात येत आहेत. जे माजी सैनिक दर शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे त्वरित नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सेना मेडल (निवृत्त) मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे. माजी सैनिक विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. जसे कवायत, सैन्य सेवेतील वैयक्तिक अनुभव, युद्धवीरांच्या शौर्यकथा, देशभक्तीपर चित्रपट आणि माहितीपटांमधील लघु क्लिप्सचे प्रदर्शन, स्वयंशिस्त, योग्य केस कापणे, स्वच्छ आणि लहान नखे ठेवणे, योग्य गणवेश परिधान करणे, पॉलिश केलेले बूट इत्यादी. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी आपली नावे 0721-2661126 या दूरध्वनी क्रमांकावर कळवावीत. किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी आर्मी नंबर, रँक, नाव, तालुका, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आवश्यक आहे.