नवलाजी बाबा विद्यालय, मंगरूळ (भिलापूर) येथे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

नवलाजी बाबा विद्यालय, मंगरूळ (भिलापूर) येथे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत
नांदगाव पेठ - 

   श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित नवलाजी बाबा विद्यालय, मंगरूळ (भिलापूर) येथे शालेय प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  रविंद्र जावरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ. जयश्री वानखडे, उपसरपंच सौ. अर्चना गुडधे, तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोकराव वानखडे आणि शिक्षक प्रतिनिधी अनिल जुनघरे सर यांची उपस्थिती होती.
   प्रारंभी  भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग ५वी ते ८वी मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, भेटवस्तू  देऊन विशेष स्वागत करण्यात आले.या प्रसंगी अशोकराव वानखडे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक रवींद्र  जावरकर यांनी नवीन सत्राचे नियोजन सविस्तर सांगत विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पांची उपयुक्तता समजावून सांगितली.
   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंगोले मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन पवार सर यांनी केले. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून एक आनंददायी आणि प्रेरणादायी दिवस संस्मरणीय करण्यात आला.