सहकारी संस्थांना पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अमरावती -
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी याबाबत सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी 2 जुलै ते 18 जुलै 2025 या कालावधीत आपल्या संस्थेचे मुख्यालय असलेल्या संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करताना काही अडचणी आल्यास, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधवा.