पोलिस असलेल्या पत्नीची खाकी वर्दी घालून पतीने अनेकांना गंडवले,
■ महिलांचीही फसवणूक; नाशिकच्या तोतया पोलिसाला नऊ महिन्यानंतर अटक
■ नकली पो.उ.नि.सागर पवार असं आरोपीचं नाव असून त्याने पोलिस उपनिरीक्षक असल्याचं भासवून अनेक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
नाशिक -
पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश परिधान करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना नाशिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरासह अनेक ठिकाणी या तोतया पोलिसाने फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सागर पवार असं आरोपीचं नाव आहे.
सागर पवारवर या आधी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. तोतया पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक असलेल्या पत्नीच्या वर्दीचा तो वापर करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे.
नकली PSI : नऊ महिन्यांपासून फरार, अखेर अटकेत
पोलिस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचला आणि सागरला अटक केली आहे. या प्रकरणी आता त्याची चौकशी केली जाणार आहे.
सागर पवारचे या आधीचे कारनामे
- पत्नीच्या पोलिस गणवेशाचा वापर.
- पोलिस असल्याचे भासवत महिलांची फसवणूक.
- पोलिसांत असल्याची ओळख सांगून विविध ठिकाणी फिरायचा.
- विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल.
- नोकरी, गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याचे आमिष.
- पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून पोलिस यंत्रणेचा गैरवापर.
- पोलिस असल्याचे भासवून ओळख लपवत राहणे.