विजय पवार वर अखेर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

  विजय पवार वर अखेर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

 ■ विजय पवारला अटक करणार का ? त्याची अटकपूर्व जामीन होऊस्तर सापडणार नाही? विजय पवारचे धागेदोरे खोल पर्यंत आहेत !

■ विजय पवारने आतापर्यंत कित्येक अल्पवयीन मलींसोबत अत्याचार केले? त्या मुली इज्जतीखातीर शातं बसल्या असतील ! 

बीड -
शहरातील नावाजलेल्या उमाकिरण संकुलामधील खाजगी क्लासेस चालविणाऱ्या दोघांवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यामध्ये स्वयंघोषित शिक्षणतज्ञ म्हणून घेणारा विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोन आरोपी आहेत. ही घटना उघडकीस येताच बीडकरांच्या पायाची आग मस्तकात गेली असून, नाकाने वांगे सोलणारा हा विजय पवार इतका निच कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर आरोपींच्या अटकेसाठी उमाकिरण संकुलास संतप्त पालकांनी घेराव घातला असून, हे पूर्ण संकुल सील करुन येथे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पालक संतप्त झाले आहेत.
बीड शहरातच नव्हे तर जिल्ह्यात मोठेपणा मिरवणाऱ्या उमाकिरण संकुलात नीट सह इतर परीक्षेचे खाजगी क्लासेस घेतले जातात. सर्वच विषयांचे एकाच ठिकाणी क्लासेस असल्याने हे एकप्रकारे शिक्षणाचे मॉल म्हटले जाते. लाखो रुपये फीस भरुन पालक आपल्या पाल्यांना येथे विश्वासाने शिक्षणासाठी पाठवितात. परंतु बाहेरचे सोडा आतीलच दोन प्राध्यापकांनी या विश्वासाला तडा देत एका अल्पवयीन मुलीच्या इज्जतीवर दरोडा घातला आहे. क्लासेस सुटल्यानंतर या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला थांबवून घेत तिला नग्न करुन या हरामखोर लिंगपसिटांनी नको ते केले आहे. हा प्रकार जुलै २०२४ ते २५ जून २०२५ या काळात हे प्रकार ते सतत करीत होते. या सततच्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी पार कोलमडून पडली आहे. वाढत जात असलेल्या प्रकाराला वैतागून तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला यानंतर पालकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विजय पवार, प्रशांत खाटोकर या दोघांवर बाल लैंगिक आत्याचार (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. बीडकरांच्या पायाची आग मस्तकात गेली असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गुन्हा दाखल झालेले दोन्ही आरोपी फरार आहेत. या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी संतप्त पालकांनी उमाकिरण संकुलास घेराव घातला आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली. यातील आरोपी विजय पवार हा शहरात शिक्षणतज्ञ म्हणून मिरवत असून सर्वात प्रथम शिक्षणाला व्यापाराचे स्वरुप देणारा ही हाच स्वंयघोषित शिक्षणतज्ञाचा सिंहाचा वाटा आहे. तसेच त्याचा उमाकिरण संकुलच नव्हे तर इतरही ठिकाणी खाजगी क्लासेस आहेत. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रत्येक शाळा व खाजगी क्लासेसच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असतानाही असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर पालकांची लूट करुन हरामचा पैसा खाऊन यांच्यातील राक्षस जिवंत झाला असल्याने यांना कोणाची भीती राहिली नाही. यामुळे या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.