शेतकरी कर्जमाफी विरोधात महामार्गावर भीम ब्रिगेडचा रास्ता रोको १२ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

शेतकरी कर्जमाफी विरोधात महामार्गावर भीम ब्रिगेडचा रास्ता रोको १२ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल


नांदगाव पेठ / प्रतिनिधी

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी भिम ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी)  सकाळी ११ वाजता अमरावती-नागपूर एक्सप्रेस हायवेवर बिझीलँड मार्केटसमोर रस्तारोको आंदोलन केल्याने नांदगाव पेठ पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भीम ब्रिगेड संघटना आक्रमक झाल्याने त्यांनी आज आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांना0पाठिंबा दर्शविला.            
     भिम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महामार्गावर चक्का जाम करत सोयाबीन व कापूस रस्त्यावर फेकण्यात आले. “बच्चूभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यामुळे नागपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.पोलीसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 

     या प्रकरणी राजेश रामदास वानखडे, प्रविण सुभाष मोहोड, विजय बाबाराव खंडारे, विजय चंद्रमणी मोहोड, शुभम सुभाष राउत, विशाल विजय वानखडे, मंगेश सुभाष गवई, रोशन भारत गवई, अविनाश भिमराव जाधव, अमित बाबाराव कुलकर्णी, प्रणय संदीप पाटील आणि सुमीत  मोहोड यांच्यावर नांदगांव पेठ पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली.