येत्या सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
■ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात ?
■ राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांची माहिती
मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यात घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. अडीच तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते. त्यामुळे निवडणुका ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा आयोगाचा मानस आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी निवडणूक घेण्यासाठी मुदत वाढवून
राज्य निवडणूक आयो महाराष्ट्र TATE ELECTION COMMISSI MAHARASHTRA
देण्याची मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिक 1, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारकडून लवकरच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना अंतिम केली जाईल. प्रभाग रचना 2011 च्या लोकसंख्येनुसार होईल. महापालिके साठी संबंधित आयुक्त तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जिल्हाधिकार्यांकडून ही प्रक्रिया
महानगरपालिका
एकूण महानगरपालिका 29 (जालना आणि इचलकरंजी नवनिर्मित)
प्रशासक असलेल्या महानगरपालिका- 29
नगरपरिषदा
एकूण नगरपरिषदा- 248
तप्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित नगरपरिषदा- 248
नगरपंचायती
एकूण नगरपंचायती- 147
प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित नगरपंचायती- 42
प्रशासक असलेल्या एकूण नगरपरिषदा आणि नगरपंचायती
(248+42)-290 जिल्हा परिषदा
एकूण जिल्हा परिषदा- 34
प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदा 32
पंचायत समित्या
एकूण पंचायत समित्या- 351
प्रशासक असलेल्या पंचायत समित्या 336
(भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणारया पंचायत समितीची मुदत में 2027 मध्ये संपणार आहे)
पार पाडली जाईल. प्रभाग रचना झाल्यानंतर आरक्षण सोडत आणि त्यानंतर मतदारयादी अंतिम केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक
कार्यक्रम घोषित होईल. या दरम्यान, आपण स्वतः विभागनिहाय दौरा करून विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी
यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेणार असल्याचे वाघमारे म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी पावसाचा अंदाज घेतला जाईल. त्यासाठी हवामान खात्याच्या तज्ज्ञ अधिकार्यांशी चर्चा करण्यात येईल, असे वाघमारे म्हणाले. मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी पॅनल पद्धत नाही. येथे प्रत्येक प्रभागनिहाय निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी ईसीआयकडून 65 हजार मतदान यंत्रे घेण्यात येणार आहेत. स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवाराच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याची मागणी अद्याप राजकीय पक्षांकडून आलेली नाही. अशी मागणी आली तर निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबत विचार केला जाईल, असेही दिनेश वाघमारे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.