परतवाडा शहरातुन होते मोठ्या प्रमाणात सरकारी तांदुळाची हेराफेरी

परतवाडा शहरातुन होते मोठ्या प्रमाणात सरकारी तांदुळाची हेराफेरी 
परतवाडा - 
विविध शहरातुन गावखेड्यातुन येणारे सरकारी तांदूळ तस्करांचे धागेदोरे परतवाडा शहरातील एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात सरकारी तांदूळ तस्कराशी जोडले असल्याची विश्वसनिय  माहिती पुढे आली आहे. सद्या शासकीय तांदूळ मोठ्या प्रमाणात खासगीत विकला जात असल्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात उघड होत असताना हे ‘कनेक्शन’ चर्चेत आले आहे. 
रेशन व शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळाची खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या घटना जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. 
या तस्करांचे जाळे दूरपर्यंत
शालेय पोषण आहारात मोफत व रेशन दुकानातून पाच रुपये किलो दराने तांदूळ वाटप होतो. लाभार्थीकडे शिल्लक राहिलेल्या तांदळाची खेडा खरेदी तस्कर करतात. अकोट परिसरातून हा तांदूळ परतवाडा शहरात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
परतवाड्याचा एक व्यक्ती हा सर्व व्यापार चालवत असल्याचे चर्चेत !
तस्करीचा तांदूळ तब्बल दहाचाकी ट्रकद्वारे ईतर जिल्ह्यात परिसरात पाठविला जात असल्याचे समजते शहरातील एक व्यक्ती  धान्य तस्कर मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी करून त्याची विल्हेवाट दूरपर्यंत लावत असल्याचे पोलिसांच्या  काही कारवाईत अनेक वेळा पुढे आले होते, हे तेवढेच खरे आहे. अमरावती मार्गावरील एका  परिसरात सदरच्या धान्य तस्करीचे मोठे गोदाम असल्याची चर्चा आहे.ईतर ठिकाणा वरून येणारा शासकीय तांदूळ हा कोणाचे आशीर्वादाने विक्री केला जातो हे जिल्हा प्रशासनाने लक्ष्य देऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे