स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा.

स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा.

 अमरावती -
भारत सरकार युवा कार्य एवं युवा खेल मंत्रालय दिल्ली, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण मुंबई, आणि रासेयो क्षत्रिय निदेशालय पुणे यांच्या आदेशान्वये सुरू केलेल्या 5 जून ते 30 जून 2025 या दरम्यान *एक पेड माॅं के नाम* या मोहिमेअंतर्गत नांदगाव पेठ येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात दिनांक 16 जून 2025 रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.*वृक्षवल्ली आम्हा सोयरे* या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे यांनी सविस्तर विवेचन केले. दरवर्षी 05 जूनला संपूर्ण जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक औपचारिकता म्हणून साजरा करायचा नसून निसर्गाशी आपले नाते पुन्हा नव्याने जोडण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी वसुंधरा रक्षणाची शपथ देण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातल्या परिसरातील कचरा व प्लास्टिकच्या वस्तू संकलित करून जलसंचनाकडे जाणाऱ्या सर्व वाहिण्यांचा कचरा साफ करण्यासोबतच परिसरातील वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे कार्य त्यांनी केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या परिसरातील स्वच्छता मोहीम राबवली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकांत माहुलकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले पर्यावरणाची काळजी घेणे ही आता निव्वळ एक सामाजिक जबाबदारी राहिलेली नसून ती मानवी अस्तित्वासाठी अत्यावश्यक बाब बनली आहे तसेच त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच झाडाची ओळख करून देणे त्यांना मातीशी, पाण्याशी, पशुपक्षांशी भावनिक नातं जुळून देणे ही काळाची गरज आहे. पृथ्वी ही आपली एकमेव आई आहे, जी आपणाला अन्न, पाणी, हवा निवारा आणि जीवन देते. तिचे रक्षण करणे म्हणजे आपले भविष्य सुरक्षित करणे. म्हणूनच पर्यावरणाचे संवाद साधा. त्याला समजून घ्या आणि त्यासाठी कृतीशील व्हा हीच खरी जागतिक पर्यावरण दिनाची शिकवण आहे असे ते म्हणाले. पर्यावरण दिन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेश ब्राह्मणे, प्रा. डॉ. सुनीता बाळापुरे, प्रा. डॉ. गोविंद तिरमनवार, प्रा. डॉ. सुभाष पवार, प्रा. डॉ. विकास अडलोक, प्रा. डॉ. पंकज मोरे, शिक्षकेतर कर्मचारी सौ. रेखाताई पुसदकर, श्री, राहुल पांडे, श्री. दिलीप पारवे, श्री. विनायक पावडे, श्री. अनिल शेवतकर व महाविद्यातील रासेयोचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.