शिक्षण व रोजगारासाठी एक व्हा, शिक्षण क्षेत्रातील लोकशाही वाचवा !

शिक्षण व रोजगारासाठी एक व्हा, शिक्षण क्षेत्रातील लोकशाही वाचवा !

■ एसएफआयचे १९वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न

■ शिक्षणाच्या बाजारीकरण विरोधात लढाई तीव्र करण्याचा निर्धार

■ एसएफआय राज्य अध्यक्षपदी रोहिदास जाधव तर राज्य सचिवपदी सोमनाथ निर्मळ

नांदगाव खंडेश्वर -
नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे १९वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दिनांक २-३-४ जून २०२५ रोजी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. 'शिक्षण व रोजगारासाठी एक व्हा, शिक्षण क्षेत्रातील लोकशाही वाचवा' ही मुख्य घोषणा या अधिवेशनातून एसएफआयने दिली. या अधिवेशनाने एसएफआयचे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष म्हणून रोहिदास जाधव तर राज्य सचिव म्हणून सोमनाथ निर्मळ यांची एकमताने निवड केली.


अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे अखिल भारतीय महासचिव मयुख बिश्वास यांनी दिनांक २ जून रोजी सकाळी केले. यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत केले. सायंकाळी ६ वाजता राज्य अधिवेशनानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तसेच जाहीर सभा पार पडली. या सभेला डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, एसएफआयचे महासचिव मयुख बिश्वास, सोमनाथ निर्मळ, रोहिदास जाधव आणि श्याम शिंदे यांनी संबोधित केले.

प्रतिनिधी सत्रात राज्यभरातून आलेल्या १८० प्रतिनिधींनी गेल्या अडीच वर्षाच्या शैक्षणिक, राजकीय, संघटनात्मक व कार्यात्मक अहवालावर चर्चा केली. तसेच अधिवेशनात शैक्षणिक मागण्यांचे २४ ठराव मांडण्यात आले असून शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, व्यापारीकरण व वाढती बेरोजगारी व अन्य मुद्यांना घेऊन संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार केला.


एसएफआयच्या १९व्या राज्य अधिवेशनाने एकमताने ४५ सदस्यांची नवीन राज्य समिती निवडली. त्यात एसएफआयच्या राज्य अध्यक्षपदी रोहिदास जाधव तर राज्य सचिवपदी सोमनाथ निर्मळ हे पुढील २ वर्षे नेतृत्व करतील. 

नवीन राज्य समिती पुढीलप्रमाणे : राज्य अध्यक्ष - रोहिदास जाधव; राज्य सचिव - सोमनाथ निर्मळ; राज्य उपाध्यक्ष - भास्कर म्हसे, मनिषा बल्लाळ, सत्यजित म्हस्के, विजय लोहबंदे, नवनाथ मोरे; राज्य सहसचिव - रामदास पी. एस., लहू खारगे, निशा साबळे, अशोक शेरकर; राज्य सचिमंडळ सदस्य - गिता दौडा, मिना आरसे, संदिप मरभळ; राज्य कमिटी सदस्य - संस्कृती गोडे, अक्षय घोडे, अंकिता धोडी, विरेंद्र दुमाडा, प्रतिक वेडगा, अंकुश कोकाटे, पवन चिंचाणे, अरूण मते, देविलाल बागुल, कल्याणी माळी, रितेश चोपडे, संदेश रामटेके, अनुजा सावरकर, विशाल शिंदे, अजय टोपले, नम्रता पटेल, लगन मंगला.स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) महाराष्ट्र राज्य समिती