मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदायक कक्षाची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरुवात.
■ मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष अधिकारी डॉ.श्यामजी गावंडे यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांची घेतली भेट.
अमरावती-
मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक गरजू नागरिकांना उपचारासाठी मोठी मदत होत असते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे नव्याने सुरु झाला असून या कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.श्यामजी गावंडे, समाजसेवा अधीक्षक श्री.पवनजी गुल्हाने, कक्ष सदस्य श्री.मंगेशजी बांबटकर यांनी आज आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट घेतली. यावेळी गरजु लोकांना लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत चर्चा झाली. या कक्षामुळे आता अमरावती जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मुंबईला न जाता या कक्षाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणेसाठीचा अर्ज सादर करता येणार असून या बाबतीत काही तक्रारी व मदत लागल्यास सहजतेने त्यांना भेटता येणार आहे.