आसोना येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षणपुस्तक व मिष्टान्न वाटप करून केले स्वागत

आसोना येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण
पुस्तक व मिष्टान्न वाटप करून केले स्वागत
अमरावती - 

   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आसोना पं.स. मोर्शी  येथे इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात पुस्तक दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करून आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला.
      शाळेचे मुख्याध्यापक मनिष काळे यांच्या मार्गदर्शनात सहशिक्षिका सौ. उषा शेकार व  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
   शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी व प्रेरणादायी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी उपस्थित पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.