परतवाडा पोलीस स्टेशनची कामगिरी अवघ्या काही तासातच किराणा दुकानफोडीचा गुन्हा केला उघड
परतवाडा -
मा.जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब अमरावती ग्रामिण यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चोरीचे गुन्हयांना आळा बसावा करिता विशेष सुचना दिल्या आहे. फिर्यादी नामे श्री. पियुष संतोष अग्रवाल, वय २९ वर्ष, धंदा किराणा दुकान, रा. नाईक प्लॉट, कांडली, परतवाडा ता. अचलपुर जि. अमरावती मो नं ८८३०८८२८२८ यांनी पोलीस स्टेशन परतवाडा यांनी दिनांक २४/०६/२०२५ रोजी रिपोर्ट दिला होता कि दिनांक २३/०६/२०२५ चे रात्री ११/०० वा.ते २४/०६/२०२५ चे सकाळी ०५/०० वा. चे दरम्यान त्याचे मालकिचे हरिओम किराणा दुकानचे शटरचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात चोराने किराणा दुकानातील गल्ल्यातील वरील प्रमाणे एकुण १७०५० रू चोरून नेलेले आहे. अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन परतवाडा येथे अप क्रमांक ४५४/२०२५ कलम ३०५ (अ), ३३४ (१) बि एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करून पोलीसांनी तपासात घेतला होता.
सदर गुन्हयासंबधाने परतवाडा पोलीस स्टेशन डि बी पथकास सदर गुन्हा लवकरात लवकर उघड करण्याबाबत सुचना वरिष्ठांनी दिल्या होत्या.
सदर गुन्हयासंबधाने परतवाडा डि बी पथक पेट्रोलिंग करीत असता गोपनिय बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि पोलीस स्टेशन रोकॅर्डवरील आरोपी नामे शेख सलिम उर्फ नायटा हा मुगलाईपुरा येथे फिरत असुन त्याचे जवळ एक मो सा क्रमांक एम एच २८ ए ५७५८ या मोटार सायकल असुन त्याचे जवळ पैसे सुध्दा आहे. अशी माहीती मिळाली असता मुगलाईपुरा बैतुल स्टॉप येथे गेलो असता शेख सलिम उर्फ नायटा हा आम्हाला बैतुल स्टॉप येथे बसलेला दिसुन आला असता त्यास पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सलिम उर्फ नायटा शेख नईम, वय ३३ वर्ष रा. मुगलाईपुरा परतवाडा ता. अचलपुर जि. अमरावती असे सांगितले आहे. नमुद आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे खिशामधुन १) ५०० रू च्या १५ नोटा असा एकुण ७५०० रू ,२) २०० रू च्या ६ नोटा असा एकुण १२०० रु, ३) १०० रु च्या २५ नोटा असा एकुण २५०० रु, ४) ५० रू च्या १०० नोटा असा एकुण ५००० रू,०५) १० रू च्या ८५ नोटा असा एकुण ८५० रू असे एकुण १७०५० रूपये मिळुन आले आहे. वरून त्याचे ताब्यातुन एक मो सा क्रमांक एम एच २८ ए ५७५८ या मोटार सायकल कि अं ३०,००० रू व नगदि १७०५० रू असा एकुण ४७०५० रू चा मुददेमाल मिळून आला असुन सदर मुददेमालासंदर्भाने पो स्टे ला अप क्रमांक ४५४/२०२५ कलम कलम ३०५ (अ), ३३४ (१) बि एन एस प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयात नगदि १७०५० रू चोरी गेलेले आहे तसेच मो सा संबधाने पो स्टे ला अप क्रमांक ४४७/२०२५ कलम ३०३(२) बि एन एस प्रमाणे गुन्हा नोंद आहे. असा एकुण मो सा व नगदि असा ४७०५० रू चा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला असुन पोलीस स्टेशन परतवाडा रेकॉर्डवरील ०२ गुन्हे उघड झालेले आहे. नमुद आरोपीस सदर गुनहयात ताब्यात घेण्यात आले असुन पुढिल कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, मा. सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अचलपुर डॉ. शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार परतवाडा, स पो नी युवराज रबडे, प्रो पि एस आय खांडेकर, हाके, पो. हे. कॉ. सचिन होले, सुधिर राउत, पो. कॉ. विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, शुभम शर्मा जितेश बाबील, योगेश बोदुले, पो. कॉ, सचिन कोकणे यांनी केली.