माजी मंत्री बच्चु कडू यांना अखेर हायकोर्टाने दिला दिलासा
अमरावती -
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांना नागपूर हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व संचालक पद कायम राहणार असल्याचे कळते. विभागीय सहाय्यक निबंधक यांच्या आदेशावरून माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूर हायकोर्टाकडे विभागीय सहाय्यक निबंधक यांच्या आदेशावर स्टे अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने बच्चू कडू हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक पदावर कायम राहणार असून ही जीत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे