परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू

परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू
अमरावती -
परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी सोमवार, दि. 23 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनधारकांनी पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह परिवहन कार्यालयात अर्ज विहित कागदपत्रांसह जमा करावेत. लिलावासाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह उपस्थित रहावे. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आल्यास अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल. उर्वरित कमी रकमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.