रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचा आज पदग्रहण समारंभ
सुनील पाठक, डॉ. जुगल चिरानिया,आनंद साठे यांची राहणार प्रमुख उपस्थिती
अमरावती (प्रतिनिधी) :-
रोटरी क्लबच्या विविध शाखांमध्ये अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या नवनियुक्त कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ 29 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता हॉटेल महफिल इन येथे आयोजित करण्यात आला आहे.
सुरेश मेटी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या पदग्रहण समारंभास रोटरीचे पीडीजी सुनील पाठक, डॉ. जुगल चिरानिया,
आनंद साठे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या पदग्रहण समारंभात रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका च नवनियुक्त अध्यक्ष युवा उद्योजक अमोल चवणे, सचिव डॉ. लोभस घडेकर, डॉ. पूजा कोल्हे ,कोषाध्यक्ष अमित तिडके, राम
छूटलानी, गौरव वानखडे, उपाध्यक्ष स्वप्निल करवा, अमित हिंडॉच्या, अखिलेश खेतान, युगंधरा गुल्हाने, संजय बोरोडे ,अतुल कोल्हे, रवी टांक, डॉ. मोनाली ढोले, नरेंद्र खंडेलवाल, संकेत मोहता ,डॉ. प्रवीण बोडखे ,हार्दिक कक्कड, निलेश खंडेलवाल, डॉ. अंकुश मानकर हे आपल्या पदाची शपथ घेणार आहे. या कार्यक्रमास रोटरी सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या नवनियुक्त कार्यकारिणीने केले आहे.