स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात सामूहिक योग दिन साजरा

स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात सामूहिक योग दिन साजरा
नांदगाव पेठ -
   21 जून 2025 रोजी यावर्षीचा अकरावा जागतिक योग दिन म्हणून स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय नांदगाव पेठ येथे शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक सामूहिक एक दिवसीय योग साधना शिबिर म्हणून साजरा करण्यात आला. या जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे परिसरात राहत असलेल्या नागरिकांना व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील शारीरिक संचालक प्रा डॉ. श्रीकांत माहुलकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. आर. जाधव यांनी सकाळी सहा वाजता महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्ताने योग साधना प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे यांनी आरोग्य आणि आत्मिक समृद्धीसाठी एक पाऊल या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले यंदा 21 जून 2025 रोजी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केल्या जात आहे. भारताची ही अमूल्य देणगी मानवाच्या समग्र जीवनशैलीला जागतिक उत्सव ठरली आहे. आज समाजामध्ये आभालवृद्धापासून अनेक जण अनेक शारीरिक आजाराने त्रासाने हैराण झालेले आहेत. त्या आजारावर रामबाण औषध म्हणजे योग साधना ही अत्यंत महत्त्वाची आहे. माणसाच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे योग साधना आपल्या विस्मरणात गेलेली आहे. परंतु देशातील सर्व नागरिकांनी योग साधना आत्मसात जर केली तर जीवनातील अनेक समस्यावर प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा आनंद घेता येईल व आपला आरोग्यावर होणारा खर्च टाळता येईल असे ते म्हणाले. याप्रसंगी सातारा येथील योग प्रशिक्षक श्री. दत्तात्रेय घाडगे म्हणाले योगाभ्यास म्हणजे फक्त आसने  नाही किंवा शारीरिक व्यायाम नाही तर तो आपल्या आरोग्याचा, मन:शांतीचा आणि आत्मिक समृद्धीचा मार्ग आहे. या दशकपूर्तीच्या ऐतिहासिक प्रसंगी प्रत्येक घरात, प्रत्येक मनात योगाभ्यास रुजवायचा संकल्प करूया. आपल्या भागातील परिसरातील आयोजित होणाऱ्या योग्य संगमात सहभागी व्हा. आपल्या कुटुंबाला, शेजाऱ्याला, मित्रमंडळींना सोबत घेण्याचा संकल्प करा असे ते म्हणाले. महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमधिकारी प्रा .डॉ. पी. आर. जाधव म्हणाले योग ही केवळ एक चळवळ नाही, ही भारताच्या आत्म्याची जागतिक अभिव्यक्ती आहे. मानवी जीवनातील छोटे-मोठे आजार व दुःख नाहीसे करायचे असेल तर आणि जीवनाचा प्रत्येक व्यक्तीला आनंद घ्यायचा असेल तर रोज नियमितपणे सकाळी प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक न विसरता रोज योगसाधना करणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
       या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा. डॉ. राजेश ब्राह्मणे, प्रा. डॉ .सुनिता बाळापुरे, प्रा. डॉ.गोविंद तिरमनवार, प्रा. डॉ. सुभाष पवार, प्रा. डॉ. विकास अडलोक, प्रा. डॉ. पंकज मोरे, शिक्षकेतर कर्मचारी सौ. रेखाताई पुसदकर, श्री. राहुल पांडे, श्री. दिलीप पारवे, श्री. विनायक पावडे, श्री. अनिल शेवतकर, श्री. छेदिलाल कोठार, माजी विद्यार्थी संघटनेचे श्री. स्वप्निल देशमुख, श्री. राजेश इंगोले, अमरावती तालुक्याचे भाजपा ग्रामीण विभागाचे सरचिटणीस श्री. अमोल व्यवहारे, श्री. सचिन इंगळे, श्री. अनुप भगत आणि महाविद्यालयातील परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, शिक्षक, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या साधनेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.