अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन युवा आघाडीचा पाठिंबा

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन युवा आघाडीचा पाठिंबा
अमरावती - राहुल कविटकर
 चांदूर बाजार तालुक्या अंतर्गत येणाऱ्या वणी (बेलखेडा) गावातील  शेतकऱ्यांची गाई, म्हशी, बैल, शेळया इत्यादी जनावरे मागील १० ते १५ वर्षा पासून वारंवार चोरीला जात आहे. आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
चोरीला जाणाऱ्या जनावरची संख्या ही ८५ आहे. ही संख्या ज्यांनी जनावरांच्या चोरीची तक्रार केली तेवढ्यांचीच आहे कोणी कोणी तर तक्रार ही केलेल्या नाही म्हणून जनावरे चोरीचा आकडा याच्या पेक्षाही मोठा असु शकतो. शेतकऱ्यांच्या जनावरांच्या वाढत्या चोरींच्या घटनेला आळा घालण्या करिता कायम स्वरूपी उपाययोजना केली पाहिजे.
सन २०१० पासून आतापर्यंत २९ शेतकऱ्यांचे जी ८५ जनावरे चोरी गेलेली आहेत त्याचा तपास करून चोरांना त्वरित अटक करण्यात यावी,सतत होणाऱ्या जनावरांच्या चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरिता हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तसेच चोरट्यांना पाठीशी घालणार्यांवर 
कारवाई करण्यात यावी, जनावर चोरींच्या घटनेमुळे ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानावर प्रशासन उदासीन दिसत आहे. म्हणून एवढे जनावरे चोरीला जाऊन सुद्धा पोलिसांना एवढ्या वर्षापासून चोरट्यांचा सुगावा लागत नाही आहे.
येवढ्या वर्षापासून आता पर्यंत पोलिसांनी एकही चोरटा ताब्यात घेतला नाही आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अक्षरशः अपयश आलेले आहे. म्हणून चोरट्यांचे मनोबल वाढत जात आहे आणि चोरीच्या घटना ज्यास्त वाढत आहे.
 सामान्य नागरिकांच्या कोणत्याही कार्यक्रमाला वेळेचे बंधन काटेकोर पणे पाळले जाते १० वाजले की साऊंड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रीय होतात. ५ मिनिट ही   १० च्या वर चालत नाहीत. मग हे सर्व नियम काय सामान्य नागरिकांसाठीच आहेत का.
सामान्य नागरिकांना एकदम सक्ती.
नेत्यांच्या बऱ्याचश्या कार्यक्रमांवर एवढी सक्ती केली जात नसते नेत्यांना थोडी फार म्हणून सुट दिली जाते आणि चोरट्यांना कायम स्वरुपी सूट दिली जात आहे.
हा सामान्य जनतेवर सरासर अन्याय होत आहे.
जनावरे चोरी करणाऱ्या चोरट्यांना लवकरात लवकर त्याब्यात घेऊन चोरट्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकारी किव्वा कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. 
वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत आहे.
करिता वरील विषयांना धरून आंदोलनकर्ते
शेतकरी मुकेश मधुकरराव अलोने तसेच सहकारी आंदोलनकर्ते यांच्या आंदोलनाला
वंचित बहुजन आघाडी पक्षाचा वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे पाठिंबा देण्यात आला.
पाठिंबा देतांना 
सुरज चव्हाण (तालुकाध्यक्ष चांदूरबाजार)
सचिन बागडे (शाखा प्रमुख वणी (बे)
गोपाल वासनिक (शाखा उपप्रमुख)
तसेच अविनाश वासनिक सोबत होते.