अमरावतीः परतवाडा रोडवर ट्रक-टाटाएस चा भीषण अपघात

अमरावतीः परतवाडा रोडवर ट्रक-टाटाएस चा भीषण अपघात

अमरावती-
अमरावती परतवाडा रोडवर असलेल्या मार्फीफाट्याजवळ अचानक ट्रक आणि टाटा एस यांचा  भीषण अपघात झाला असता नमन सगने वय अंदाजे पंचवीस वर्षे राहणार निंभारी या युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. सदर रोडवर असलेला मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात, हा अपघात झाला असल्याचे उपस्थिताचे बोलण्यावरुन सांगण्यात येते. 
या अपघातात पिकअप चालक यश धनराज गोळे याची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला अमरावती येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. आसेगाव पोलिसांची टीम घटनास्थळावर पोहचली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.