■ विधार्थीच्या प्रत्येक प्रकारच्या बाबींसाठी कटिबद्ध राहू : ओम किशोरराव मोरे
नांदगाव खंडेश्वर -
फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेल्या शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या आकाराची, रंगाची दप्तरे घेतलेली आई-बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली, काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी असलेली मुले, काही कुतूहलाने बघत असलेली, हसत,खेळत असलेली मुले, रडणाऱ्या मुलांना समजावत असलेले शिक्षक, सचिंत चेहऱ्याने उभे असलेले पालक.. हे दृश्य शाळांमध्ये दिसून आले.
अनेक शाळा सोमवारी, 23 जून रोजी सुरू झाल्या. अनेक छोट्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा आज श्रीगणेशा झाला. शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांना शाळेची गोडी लागावी, भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. फुगे, खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होते. वर्गखोल्याही आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच लक्ष्मी राऊत, मुख्याध्यापक शंकर कवाने, प्रमुख उपस्थित ओम मोरे, शिक्षिका अनिता जुंबडे, शिक्षिका मोनिका गांजीवाले, हर्षा पुसदकर, वैशाली पुसदकर, संतोष कळसकर इ. पालक उपस्थित होते.