कपाशी बियाण्याचा साठा जप्त अंजनगाव सुर्जी शहरात कृषी अधीकारी राठोड यांनी शेतकऱ्याचा वेष धारण करून केली फिल्मी स्टाईल कार्यवाही
चांदूर बाजार -
अमरावती जिल्ह्यात अवैध कापूस बियाणे दाखल होताच त्यासंबधी कृषी विभागाने कार्यवाही सत्र सुरू केले आहे. त्याच माध्यमातून अजनगाव सुर्जी येथे कार्यवाही केल्या गेली या कारवाईत १७४ पॅकेट ज्यांची किंमत २ लक्ष ४४ हजार ३८७ रुपये असून, विक्रीची परवानगी नसलेले एचटीबीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे. तालुक्यातील ही पहिलीच कार्यवाही असुन बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल झाला असल्याने तालुक्यात अवैध विक्री करणाऱ्याऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दि. १९ रोजी देवनाथ नगर, सूर्जी अंजनगाव येथे सापळा रचून राहत्या घरातून प्रतिबंधीत एचटीबीटी बियाण्याचा साठा पकडला असुन एकूण १७४ पॅकेट जप्त करण्यात आले आहे ज्याची किमल २ लक्ष ४४, हजार ३८७रुपये आहे. आरोपी विनोद वा. सरोदे (५४) हा बऱ्याच दिवसा पासुन एचटीबीटी बियाण्याचा अवैध व्यवसाय करतो. अश्या निळालेल्या गुप्त माहीतीवरून त्यास पकडण्यासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अश्विन राठोड यांनी शेतकऱ्याचे वेषांतर करून आरोपीला बियाण्याची मागणी केली व आरोपीने बियाणे विकत देण्याचे मान्य केल्यानंतर पथकातील प्रफुल्ल सातव उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर, विराग देशमुख जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक
अमरावती, भारती जाधव तालुका कृषी अधिकारी, नरेंद्र वसुकर कृषी अधिकारी, अश्विन राठोड कृषी अधिकारी पंचायत समिती ता. कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या सदस्यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आरोपीच्या राहत्या घरी धाड टाकून घराची तपासणी केली असता तेथे अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला. त्यामध्ये एचटीबीटी बियाण्याचे पॅकेट सख्या १७४ ज्याची किमत रुपये २,४४,३८७ एवढी आढळली त्यामध्ये अजीत १५५-४जी, आरआर ६५९, गोल्ड ५-जी, एसएटी महाशक्ती ५-जी, सुमो गोल्ड ५-जि, साकेत गोल्ड, ग्लायकोगार्ड एच१०१ नावाचे पाकीटांचा समावेश आहे. सदर कार्यवाही राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अमरावती व मल्ला तोडकर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले असुन आरोपी विनोद सरोदे यास भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत ३१८ (४) ३३६ (४) ३४० (२) कृषी विभाग जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे २ लाख ४४हजार ३८७ रुपयांचेबियाणे नियम, १९६८ (७) (८) नियत्रण आदेश, १९८३ (३) (९) पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ (१५), अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ (३) (७) (९) या विविध कलमान्वये आरोपीस अटक केली. ही कारवाही सकाळी तीन वाजेपर्यंत चालाली असून पुढील तपास ठाणेदार अवतारसींग चव्हान यांचे मार्गदर्शनात सपोनी सागर भाष्कर है. का. प्रमोद चव्हाण करीत आहेत.
यावेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी अशा प्रकारची अनधिकृत बियाण्याची विक्री होत असेल, तर त्याची सूचना भरारी पथकाला द्यावी, व शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये. तसेच अधिकृत कृषी सेवा केंद्र दुकानातूनच पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भारती जाधव यांनी केले आहे.
अंजनगाव सुर्जी शहरात सापडलेल्या आनधिकृत बियाणे विक्रीत तालूक्यातील काही मोठ्या लोकांचा हात असल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली असून, पोलीस प्रशासनापुढे मुख्य आरोपीस पकडणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.