शाळेच्या प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव
जि.प. हायस्कुल नांदगाव पेठ येथे विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
नांदगाव पेठ -
येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नववर्षाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात झाली. यंदाच्या प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून तसेच पारंपारिक टोपी घालून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्या वृषाली इंगळे, प्रा. मोरेश्वर इंगळे, दिनकर सुंदरकर, सचिन हटवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली तायडे, शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे,उपमुख्याध्यापक राऊत सर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
नियोजित वेळेत शाळा सत्राला प्रारंभ झाला. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उपस्थितांच्या हस्ते स्वागत करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यांनतर शाळेच्या प्रांगणात शिक्षकवृंद तसेच मान्यवरांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशोत्सवदरम्यान प्रचंड उत्साह होता.यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षक वृंदांचेही शाळेत स्वागत करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.