लाचेची मागणी करणारा लोकसेवक ग्रामसेवक पोलिसांच्या जाळ्यात
मरावती -
मंगल कार्यालयाच्या एक परवानगी करिता लाचेची मागणी करणारे ग्रामसेवकाला, अमरावती विभागाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतांना रंगेहात अटक केली आहे. अर्जुन पवार असे लोकसेवक ग्रामसेवकाचे नाव असून त्यांनी मागणी केलेली तिस हजार रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वडनेर भुजंग येथील सर्वज्ञ मंगल कार्यालयावर ग्रामपंचायतीचा असलेला थकीत मालमत्ता कर कमी करून देण्याकरिता लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडून, अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.