तस्करीचा डाव उधळला ! गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपींना केली अटक
जळगाव:-
मध्यप्रदेशातून गावठी कट्टूयाची तस्करी करणाऱ्यांना पथकाने थांबवले. मात्र ते पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जावू लागले. एलसीबीच्या पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत संशयित गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) व निसानसिंग जीवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी. ह. मु. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह दोन गावठी कट्टे हस्तगत केले.
सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील सिरवेल येथून अवैधरित्या गावठी कट्टे विक्री करणारे दोन जण रावेर तालुक्यातील पाल मार्गे महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ रवी नरवाडे व पोहेकॉ गोपाळ गव्हाळे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ रवी नरवाडे, गोपाल गव्हाळे, नितीन बाविस्कर, बबन पाटील, दीपक चौधरी यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने पालच्या जंगल परिसरात सापळा रचला होता.
दरम्यान, मध्यप्रदेशकडून (एमपी १०, झेडसी ९६५०) क्रमांकाच्या दुचाकीवर एक जण तर दुसऱ्या (एमपी १०, एमव्ही १४६२) क्रमांकाच्या दुचाकीवर दुसरा संशयित येतांना दिसले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून २ गावठी कट्टे, दोन दुचाकी व मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक तुषार पाटील हे करीत आहे.