शाळा सुरु झाल्या मात्र संस्था चालकांची दादागिरी काही कमी झाली नाही..!

शाळा सुरु झाल्या मात्र संस्था चालकांची दादागिरी काही कमी झाली नाही..!

■ ते सांगतील तेथून कपडे खरेदी करा म्हणत  पालकांवर दबाव टाकण्यात येत असल्याची जिल्ह्यात स्थिती ..!,

■ जोर जबरदस्ती करणार्या शिक्षण संस्था चालकांकडे लक्ष द्यायला मात्र जिल्हा प्रशासनाचे प्रशासनाचे दुरलक्ष्य !
 
अमरावती - 
शैक्षणिक वर्ष सुरू होताच जिह्यातील अनेक नामांकित शाळांनी पालकांचे खिसे रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. शाळेचा ड्रेस आम्ही सांगू तेथूनच खरेदी करा असे फर्मान विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.सक्ती करु नये असे शासनाचे आदेश असतांना हे लोक मनमानी का करत आहेत असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील शाळा चालकांची दुकानदाराची मात्र कमीशन साठी जोमात सुरु असल्याचे दिसत आहे. तर ड्रेस खरेदी करिता शाळा संचालकांची कपडा दुकानदारांशी सेटिंग करीत त्याकडून सर्व खरेदी करण्यास सांगितले जात आहे.सेटिंग झालेलं दुकान यांचे दर बाजारपेक्षा जास्त आहेत.हे दर पालकांना परवडत नाहीत पण खरेदी नाही केली तर पाल्याला त्रास होईल म्हणून पालक इच्छा नसताना खरेदी करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. शाळा यास ज्ञान मंदिर म्हटले जाते. शाळा सुरू करणाऱ्यांना सर्वात मोठा सामाजिक कार्यकर्ता अथवा

गांधी वादी व्यक्ती म्हणून आदर असे पण आता काळ बदलत गेला आणि या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काही चुकीचे निर्लज्य माणसं आली आणि इतरही काही अन् या शिक्षण संस्थांचा बाजार झाला. याचा शिखर रचला खाजगी क्लासेस आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी यांनी तर सरळ शिक्षणाचा व्यापार केला. एका इंग्रजी शाळेचा फर्मान तर पुस्तक, वह्या ड्रेस आम्ही सांगून तेथूच घ्यावी लागेल असा आहे. या शाळांच्या दुकानदारीला आता कोणी लगाम लावणार का? असा प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी साहेब या शाळांची झाडाझडती घ्या

अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील संस्था व इंग्रजी व इतरही काही नामांकित शाळा जे पालकांची लूट करीत आहेत या शाळांना भेटी देऊन एकदा झडती घेऊन अशा शाळांवर कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य जनता आपणा कडून करीत आहे.

या प्रकारामुळे शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणी लक्ष घालून तातडीने योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे, जेणेकरून पालकांची पिळवणूक थांबेल आणि त्यांना गणवेश खरेदीचे स्वातंत्र्य मिळेल.