वाढदिवस साजरा न करण्याचे बच्चु कडु यांचे कार्यकर्ता पदाधिकारी यांना निर्देश
अमरावती -
दि. ५ जुलै २०२५ रोजी माजी मंत्री बच्चु कडु यांचा वाढदिवस आहे. मात्र सध्या राज्यभरात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी, विधवा, दिव्यांग व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या संघर्षाची गांभीर्यपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता, वाढदिवसानिमित्त कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश बच्चु कडु यांनी दिले आहेत.
दिनांक ७ जुलै २०२५ पासून ७/१२ कोरा कोरा कोरा पदयात्रा" ही पापळ (जि. अमरावती) ते चीलगव्हाण (जि. यवतमाळ) असणार आहे. ही पदयात्रा शेतकरी, कष्टकरी, विधवा, बेरोजगार, दिव्यांग व इतर वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी लढा देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर खालील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात :
वाढदिवसानिमित्त हार, तुरे, पोस्टर, फलक, बॅनर इत्यादी माध्यमातून कार्यक्रम साजरा करू नये.
कोणतीही जाहिरातबाजी अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये.
आपणास जर वाढदिवसानिमित्त काही करावयाचे असल्यास, दि. ७ जुलै रोजी पापळ येथे कार्यक्रमस्थळी उपसिथत राहुन आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी, ही नम्र विनंती. वरील निर्देशांचे उल्लंघन झाल्यास, संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे पत्र बच्चु कडु यांनी जाहिर केले आहे.