सोहळा कौतुकाचा,सत्कार गुणवंतांचा,
सन्मान पालकांचा!
यवतमाळ -
काल दिग्रस येथे दरवर्षीप्रमाणे १० वी, १२ वीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या ५०० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या कौतुक सोहळ्याला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी उपस्थित राहून त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला तसेच त्यांच्याशी संवाद साधला.
आज कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही, सातत्य ठेवणे गरजेचे आहे. यश हे नशिबाने नव्हे, तर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळते.
आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की यशाच्या मागे अपयश लपलेले असते. गुणवंत विद्यार्थीही काही इतर बाबींमध्ये अनेकदा अपयशी झाले असतील, पण त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक अपयश एक शिकवण देत असते, त्याचा स्वीकार करायला शिकले पाहिजे.
थॉमस एडिसनने १००० वेळा अपयश आल्यानंतर बल्ब शोधून काढला. अपयशाने ते खचले नाही, सातत्याने अपयशावर मात करत त्यांनी यशाला गवसणी घातली आणि बल्बचा शोध लावला. त्यामुळे आपल्या अंगी नेहमी नम्रता आणि मूल्यांचा आधार असावा जो यशासाठी महत्वाचा ठरतो.
आज आपण जे आहोत ते शिक्षक, आपले आई - वडील म्हणजेच पालक आणि समाजाच्या योगदानामुळे आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपल्या यशामध्ये अनेकांचे हात असतात त्यामुळे मदत करणाऱ्यांना, प्रोत्साहन देणाऱ्यांना कधी विसरू नका. नेहमी मी" च्या जागी "आपण" ही भावना ठेवा.
जीवनात एक उद्दिष्ट ठेवा आणि त्यानुसार पुढे जा. तुम्हाला मिळालेले यश व आजचा सत्कार म्हणजे तुमच्या पुढील प्रवासाची सुरुवात आहे. स्वप्नं उराशी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत राहा तुमचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल राहील हे मी जबाबदारीने सांगतो.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न तेच बघा जे तुम्हाला झोपु देत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून स्वप्नं साकार करण्यावर भर द्यावा.
जगात कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवो वा न ठेवो, पण तुम्ही स्वतःवर ठेवलेला विश्वासच निर्णायक ठरतो. आपण केवळ यशस्वी नव्हे, तर इतरांसाठी उपयोगी असायला हवे म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी करा, त्यामुळे तुम्ही अधिक समृद्ध व्हाल असे ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
यावेळी डॉ. बी. एन. स्वामी (IFS), पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली ताई मासाळ, सुधीर देशमुख, राजकुमार वानखडे, उत्तममामा ठावकर, संदीप दुधे, मिलिंद मानकर, बाबूसिंग जाधव, अरुण राठोड, प्रेम राठोड, डॉ.मनोज टेवरे , संजीव चोपडे, दिवाकर राठोड, यादव गावंडे, यादव पवार, जॉकी राठोड, गायक श्रीकांत टकले, संजिवनीताई शेरे, वर्षाताई नीकोट, दुर्गाताई दुधे, माधुरीताई महल्ले, प्रावीनाताई अस्वार, शितलताई उदगीर, संगीताताई वानखेडे आदींसह विद्यार्थी व पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.