राजेश लोखंडे यांना मातृशोक

राजेश लोखंडे यांना मातृशोक 


अमरावती -
प्रतिनिधी-स्थानिक फरशी स्टॉप परिसरातील विमल कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा पिनाक लॅबचे संचालक राजेश रमेश लोखंडे यांच्या मातोश्री श्रीमती रंजना रमेश लोखंडे वय 82 यांचे बुधवारी रात्री बारा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. 
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना ,नातू ,पणतू व बराच मोठा आप्त परिवार आहे. आज दुपारी चार वाजता स्थानिक हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.