भांडे अकॅडमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अमरावती -
शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भांडे सर अकॅडमीचा अठरावा वर्धापन दिन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे नुकताच पार पडला.यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
"गौरव गुणवंतांचा, सोहळा आनंदाचा" या संकल्पनेत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश वानखडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बमनोटे आणि सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खेरडे उपस्थित होते. यावेळी विचारपीठावर एकनाथ भांडे, महेंद्र वल्ली, शशांक वाट, विकी वगारे, अनुप मडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात 170 पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे अकॅडमीच्या निकालात 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 90 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत.
यामध्ये सुजल बनसोडे या विद्यार्थ्यांने केमिस्ट्री विषयात 100 टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याचा एकूण पर्सेंटाइल 99.52 आहे. आर्यन जयस्वाल याने सर्व विषयांत 99% पेक्षा अधिक गुण मिळवून द्वितीय क्रमांक, शर्वरी साखरवडे हिने 98.90% गुणांसह तृतीय क्रमांक, तर संचित बलिंगे याने 97.78% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक आशिष भांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.