माजी आमदार श्री. ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश


माजी आमदार श्री. ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश 


मुंबई- 
आज मुंबईतील बाळासाहेब भवन येथे अमरावती जिल्ह्यातील उबाठा पक्षाचे, बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासह उबाठाचे उपमहानगरप्रमुख व नगरसेवक सुनील राऊत, उबाठा गटाचे बडनेरा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील, उपजिल्हाप्रमुख पवन दळवी, तालुका प्रमुख राहुल लांजेवर, निलेश तिवारी, संतोष मनोहर, निलेश पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

या प्रसंगी विधान परिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, माजी मंत्री, आमदार दिपक केसरकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेत्या कला शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहूल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.