भारत कृषक समाज युवक जिल्हा अध्यक्षपदी डॉ नितीन टाले

भारत कृषक समाज युवक जिल्हा अध्यक्षपदी डॉ नितीन टाले
 अमरावती - 
भारत कृषक समाज युवक अमरावती जिल्हा अध्यक्षपदी डॉ नितीन टाले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
भारत कृषक समाज ही भारतातील आघाडीची निरपेक्ष शेतकरी संघटना आहे जी शेतकरी समृद्धीसाठी तसेच आपल्या देशाला लाभदायक असलेल्या निरोगी, शाश्वत, समावेशक आणि समतापूर्ण अन्न प्रणालींसाठी काम करते.  १९५५  साली डॉ. पंजाबराव  देशमुख यांनी स्थापन केलेला भारत कृषक समाज  हा एक असा मंच आहे  आहे जिथे अन्न प्रणाली मजबूत करण्यात रस असलेले प्रत्येकजण एकत्र येऊ शकतो आणि  जमिनीतून अधिक उत्पादन घेणाऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांची बुद्धिमत्ता, संसाधने आणि ऊर्जा चांगल्या प्रकारे वापरू शकतो. शेतकरी जगाला अन्न देतात आणि जगातील बहुतेक नैसर्गिक संसाधनांचे - माती, पाणी आणि ऊर्जा - जबाबदारीने व्यवस्थापन करतात. तरीही शेतकरी कुटुंबे सर्वात गरीब, सर्वात कुपोषित आणि हवामान बदलासाठी सर्वात असुरक्षित आहेत. भारत कृषक समाज शेती अनुभवावर आधारित पुराव्यावर आधारित अन्न आणि कृषी धोरण याची शिफारसी करते, तसेच बहु-भागधारक संशोधन, भागीदारी आणि संवाद, कार्यशाळा आणि परिषदा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करते . 
  युवा शेतकऱ्यांना संघटित करून भारत कृषक समाजाची कामकाज अधिक गतिमान करण्याकरिता डॉ नितीन टाले यांची नियुक्ती  युवक जिल्हाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे.
 डॉ. टाले यांनी आपल्या नियुक्ती बद्दल भारत कृषक  समाज महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशराव मानकर , मार्गदर्शक दिलीपबाबू इंगोले, प्रा. डॉ. हेमंतराव देशमुख, प्रा. डॉ.हेमंतराव काळमेघ, भारत कृषक समाज जिल्हाध्यक्ष प्रा. भैय्यासाहेब मेटकर, नरेशभाऊ पाटील, ,  नारायणराव मानकर,भैय्यासाहेब वानखडे,  दिलीपराव देशमुख, मधुकरराव काळे, प्रा. राजीव रिठे, विनोदराव ठाकरे, प्रा. राजेश गांजरे,अक्षय इंगोले, दीपक उतखेडे, सुरेश आडे, अजय लेंडे, प्रकाशराव कोरपे, डॉ. कुमार बोबडे, अमोल इंगोले, सौरभ घोगरे यांचे आभार मानले.

कधी नव्हे एवढे विदारक परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे, दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. देशातील सर्वात जास्त आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्हा आहे. युवा शेतकऱ्यांना एकत्र करून कृषी धोरणावर प्रभाव टाकणे, शेतकऱ्यांना पाठबळ व प्रोत्साहन देण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन. चर्चासत्रे परिषदा कार्यशाळेचे आयोजन,  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदतीकरिता हेल्पलाइन. शेतकरी समुपदेशन  केंद्र अशा उपक्रमांचे नियोजन करण्याचा मानस डॉ नितीन टाले यांनी व्यक्त केला.