यवतमाळ एमटी विभागातील पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध महिलेची पोलिसात तक्रार दाखल

यवतमाळ एमटी विभागातील पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध महिलेची पोलिसात तक्रार दाखल
■ पोलिसांनी महिलेचे बयाण नोंदविल्याची चर्चा
■ प्रकरण दडपण्यासाठी अधिकारी करतोय प्रयत्न 
■ वरिष्ठ पोलिस अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य 
■ वाहन चालक बदली प्रकणात याच अधिकार्याने मोठी उलाढाल करुन चॉईस बदल्या करण्यास वरिष्ठाची दिशाभुल करुन मलिदा लाटल्याची चर्चा

यवतमाळ - 
यतमातळ जिल्हा  पोलिस दलातील एमटी विभागात कार्यरत  एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरुद्ध पोलिस स्टेशन मध्ये एक महिलेची तक्रार प्राप्त झाली असल्याची जनचर्चा जोरदार सुरु आहे.
या घटनेतील पीडित महिलेचे  शुक्रवारी दि. 27 जुन रोजी दुपारी बयान नोंदविल्या गेल्याचे बोलले जात आहे. नेहमीच वादग्रस्त ठरत असलेला यवतमाळ एमटीओ विभाग त्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत येऊन या विभागावरच संशयाची सुई निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
बरेच वेळा  या नाही तर त्या कारणावरून एमटीओ विभागातील एक अधिकारी वादाच्या भोवऱ्यात असतो त्याच्या अनेक तक्रारी या आदी सुद्धा करण्यात आल्या आहेत.  त्याची याअगोदर तर  एका मोठ्या  प्रमुख अधिकाऱ्याकडून चौकशी झाली आहे. ते प्रकरण शांत होत नाही तर आता पुन्हा एकदा त्याच अधिका-याविरूध्द यवतमाळच्या अवधुतवाडी पोलिसात तक्रार प्राप्त झाल्याची चर्चा पोलिस प्रशासनात दबक्या आवाजात रंगु लागली आहे.  तक्रारीवरून पीडित महिलेचे बयानही नोंदविण्यात आल्याचे बोलले जात असुन . सदरचे गंभीर तक्रारीवरून आता प्रशासनात चांगलेच रान उठले आहे. चौकशी नुसार सदरचे प्रकरणात अधिकार्यावर पोलिस गुन्हा दाखल करतात की, नेहमीप्रमाणे त्या  अधिकाऱ्याला या प्रकरणात बचावले जाईल, हे मात्र येणारी वेळच ठरवेल. मात्र महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सद्या यवतमाळ पोलिस दलात विविध चर्चांना उधान आले आहे.
तक्रारीबाबत मात्र गोपनियता पाळली जात आहे.