योगप्रचारासाठी डॉ. मेघा ठाकरे यांचे ७ दिवसीय मोफत योग शिबिर उत्साहात

योगप्रचारासाठी डॉ. मेघा ठाकरे यांचे ७ दिवसीय मोफत योग शिबिर उत्साहात 

■ विविध योग क्रिया, आहार मार्गदर्शन, ॲक्युप्रेशर व योगमुद्रांचा समावेश

नांदगाव पेठ / प्रतिनिधी

   योग निसर्गोपचार व आहारतज्ञ डॉ. मेघा ठाकरे यांचे निशुल्क सात दिवसीय योग शिबिर रहाटगाव येथील वृंदावन अपार्टमेंट येथे उत्साहात पार पडले. ५ जून ते ११ जून या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात आयुष आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, नांदगाव पेठ येथील योग टीमने  सहभाग घेतला.या शिबिरात उपस्थित नागरिकांना योग, संतुलित आहार, ॲक्युप्रेशर, योग मुद्रा, एरोबिक्स आणि योगिक शुद्धिक्रिया यांचे सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. प्रत्येक सत्राला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
    शिबिराचे आयोजन स्मिता काळबांडे व वंदना शेरेकर यांनी केले होते.वृंदावन अपार्टमेंटचे अध्यक्ष अमित वसु यांचे या योग शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नांदगाव पेठ येथील योग शिक्षिका उषा शेंदरकर, ज्योती बावणे, पल्लवी केचे, सीमा घोडेस्वार, आशा शेंदरकर तसेच रमण शेरेकर, राधिका शेरेकर, रिद्धी ठाकरे यांनी विशेष मेहनत घेतली.
   डॉ. मेघा ठाकरे यांच्याकडून पोटे टाऊनशिप येथील गजानन मंदिर हॉलमध्ये दररोज नियमित योगवर्ग घेतले जात असून, त्यांनी याआधीही अनेक ठिकाणी योगप्रसारासाठी शिबिरे आयोजित केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेले हे शिबिर आरोग्यप्रेमींना एक सकारात्मक अनुभव ठरला.