दर्यापूर शहरात दोनच अधिकृत केंद्रे; अनधिकृत पणे विक्री होणाऱ्या नंबर प्लेटवर वाहतूक विभाग लक्ष देणार काय..?
अमरावती -
दर्यापूर : उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRPs) ही शासनाने अनिवार्य केलेली एक महत्त्वपूर्ण योजना सध्या शासनाने अमलात आणली असून ज्याचा मुख्य उद्देश वाहन सुरक्षा वाढवणे आणि वाहन-संबंधित गुन्हे, विशेषतः चोरी आणि फसवणूक कमी करणे आहे. ही प्लेट अॅल्युमिनियमपासून बनवल्या जातात आणि त्यात अनेक विशिष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट असतात.
या सुरक्षा प्लेट्सची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे लेझर-कोरलेले सिरीयल नंबर, क्रोमियम होलोग्राम, 'इंडिया' हा शब्द असतो तसेच उत्पादन करणाऱ्या एजन्सी तसेच तपासणी करणाऱ्या संस्थांची ओळख पटवणारे अद्वितीय लेझर नंबरिंग, नोंदणी क्रमांक प्लेट्सवर कोरलेले असतात, ज्यामुळे त्यांची नक्कल करणे अत्यंत कठीण होते. याव्यतिरिक्त, विंडशील्डवर चिकटवला असतो अश्या
या नंबर प्लेट साठी सध्या वाहन धारक
आपल्या वाहनाला हाय स्पीड नबर प्लेट बसवण्यासाठी दर्यापूर शहरात दोन अधिकृत सेंटर दिलेले आहेत मात्र दर्यापूर शहरात या नंबर प्लेट साठी दलाल सक्रिय झाले असून ते वाहनधारका कडून भरमसाठ पैसे घेऊन वाहनधारकांची फसवणूक करत असून अश्या बेकायदेशीर पने नंबर प्लेट विकणाऱ्या दलालांनवर वाहतूक विभागाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून जनतेची होणारी पिळवणूक थांबवावी
अधिकृत दर काय आहेत?
महाराष्ट्र शासनाने HSRP साठी निश्चित केलेले अधिकृत दर (GST आणि फिटमेंट शुल्कासह) खालीलप्रमाणे आहेत दुचाकी / ट्रॅक्टर: ₹531 प्रति वाहन. तीनचाकी वाहने (ऑटो रिक्षा): ₹590 प्रति वाहन. चारचाकी आणि अवजड वाहने: रुपये 879 प्रति वाहन.