महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड यांची बच्चूभाऊ कडू यांचे उपोषणाला भेट
अमरावती -
मोझरी येथे आज प्रहारचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांचे दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या उपोषणाला राठोड यांनी भेट देऊन त्यांच्याशी व उपस्थित बांधवांशी संवाद साधला.
मा. बच्चू कडू यांचे उपोषण हे दिव्यांग, शेतकरी, आणि सामान्य जनतेच्या वेदनांशी जोडलेले होते. मी त्यांना विनंती केली की येणाऱ्या मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत ते स्वतः या विषयावर चर्चा करून मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, आणि मा. अजितदादा पवार यांच्यासोबत निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते बोलले.
65 वर्षीय दुर्वास मधुकर जमले, 70 वर्षीय सुमन साळवे, राजेश जयस्वाल, कान्होपात्रा खडसे या ज्येष्ठ उपोषणकर्त्यांची प्रकृती लक्षात घेऊन आणि मा. बच्चूभाऊ कडू यांचा आदर ठेवून, त्यांनी संजय राठोड यांचे विनंतीला मान देत उपोषण मागे घेतले.
यावेळी मंत्री राठोड साहेब यांच्या सोबत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीतीताई बंड, जिल्हा प्रमुख अरुण पडोळे, जिल्हा प्रमुख प्रमोद गदरेल, उपजिल्हा प्रमुख गुणवंत हरणे, तालुका प्रमुख मंगेश काळमेघ, शिवसेना तिवसा तालुकाप्रमुख श्रीहरी बोकडे, युवतीसेना जिल्हाप्रमुख तेजस्विनी वानखेडे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय वानखेडे, सलीमभाऊ खेतानी, उपविभागीय अधिकारी मुंनु मॅडम,तहसीलदार मयूर कळसे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.