स्वताचे राहत्या घरात इसमाची गळफास लावून आत्महत्या

स्वताचे राहत्या घरात इसमाची गळफास लावून आत्महत्या
तिवसा - 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या अनकवाडी येथे 35 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, विजय धनराज वाघमारे अशे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मृतक इसमाची पत्नी लग्नकार्य निमित्त बाहेरगावी गेली होती. पत्नीने फोन लावला असता फोन उचलला गेला नसल्याने पत्नी तातडीने घरी पोहोचली असता तिला मृतक इसम गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेचा पुढील तपास तिवसा पोलिसांकडून सुरू आहे