चांदूर रेल्वे नगरपरिषदेवर काँग्रेसचा हल्लाबोल
नपच्या कामकाजावर मा.जगताप आमदार भडकले
चांदूर रेल्वे :-
नगरपरिषद 2016 ते 2021 पर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कालावधी संपल्यानंतर मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी नगरपरिषद मध्ये मनमानी सुरू केली आहे. चांदूर रेल्वे मध्ये सर्व नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्या विरेंद्र भाऊ जगताप यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी यांना वेळ मागून नियमाप्रमाणे नगरपरिषद कर्मचारी काम करत आहे का? याची चांगलीच कान उघाडणी केली.
कर्मचारी सुट्टीचा अर्ज न टाकता नगर परिषद मध्ये गैरहजर आढळले त्यावर मुख्याधिकारी काय कारवाई करेल अशी विचारणे केली.शहरात मध्ये पावसाळ्याच्या आधी नाले साफसफाई केले जातात मात्र गेल्या चार वर्षापासून त्या नाल्याचा कचरा नाल्याच्या काठावरच टाकून ढिगारे तयार झालेले आहे.हा नाला शहरातून मधोमध आहे.आणि पाणी आले तो कचरा पूर्ण रस्त्यावर पसरत आहे शहरामधील आठवडी बाजारात नाल्याच्या कचऱ्याच्या ढिगार्यावर भाजीपाल्यांचे भरपूर दुकाने लागतात .आणि त्याच दुकानातला मान चांदुर रेल्वे मधील नागरिक घेतात .व त्यांच्या आरोग्याची खेळल्या जात आहे. असा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला .शहराच्या मधोमध हा नाला गेल्यामुळे या नाल्याचा कचरा पूर्ण चांदुर रेल्वेच्या शहराच्या मधोमध टाकला गेला आहे .विद्यार्थी नागरिक या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अस्वस्थ आहे. चांदुर रेल्वे शहरांमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून सिमेंट रस्ते बांधलेले उघडून टाकले आहे .मात्र मातीचे ढिगारे सिमेंट रस्त्याच्या पसरल्यामुळे अनेक अपघात झाले आहे विद्यार्थी , नागरिकाना त्यांचा खूप मोठा त्रास होत आहे .यासंदर्भात शहर काँग्रेस कमिटीने अनेक निवेदन नगरपरिषद ला दिले परंतु मुख्याधिकारी व कर्मचारी यावर कुठली कारवाई केली नाही. वीरेंद्र भाऊ जगताप यांनी स्वतः उपस्थित राहून या अनेक मुद्द्यावर नगरपरिषद वर हल्लाबोल केलेला आहे .
नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी येत्या मंगळवार पर्यंत संपूर्ण विषयावर माहिती घेऊन ठेकेदारावर व साफसफाई कारवाई करू असे आश्वासन दिले आहे .वीरेंद्र भाऊ शहर काँग्रेस कमिटीने जर मंगळवार पर्यंत मुख्याधिकारी यांनी कारवाई केली नाही यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही येत्या काळात करून असे सांगितले. यावेळी प्रा. प्रभाकर वाघसर, शिट्टदादा सूर्यवंशी ,देवानंद भाऊ खुणे, अमोल होले, निवास भाऊ सूर्यवंशी, हर्षल वाघ , सुमेध सरदार ,महेश कलावटे ,प्रफुल कोकाटे ,बालू देशमुख ,राजू लांजेवार ,संदीप शेंडे, पंकज मेश्राम ,शरद घासले, दिनेश वाघाडे ,सक्षम वानखडे ,रितेश शेळके , हाजी अनिस भाई सौदागर , अनिल फरकाडे, दीपक अग्रवाल ,अर्पित चौधरी जाकीर भाई रमेश गिरडकर , सतीश देशमुख, ईत्यादी उपस्थित होते.