एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी अर्ज आमंत्रित
अमरावती, दि. 12
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत यावर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षीच्या सन 2025-26 अंतर्गत क्षेत्र विस्तार घटकातंर्गत स्ट्रॉबेरी लागवड, ड्रगन फ्रूट, पुष्पोत्पादन, मिरची लागवड, लहान मशरूम उत्पादन प्रकल्प, सुगंधी व औषधी वनस्पती अंतर्गत गुलाब, रोझमेरी, ट्यूबरोज, जीरॅनियम, कॅमोमाइल दावना, जस्मिन, लॅव्हेडर, पालमारोसा, लेमनग्राम, तुळशी, वेटीव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळस औषधी वनस्पती अंतर्गत पिंपळी, सफेद मुसळी, शतावरी, संत्रा पुनरूज्जीवन, सामूहिक शेततळे, नियंत्रित शेती घटकांतर्गत शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, फ्रुट बंच कव्हर, मधुमक्षिका वसाहत आणि फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत टॅक्टर 20 एचपीपर्यंत, पॉवर टिलर, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर 16 लि., काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत फार्मगेट पॅक हाऊस कांदाचाळ या बाबींचा समावेश असलेला कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास तालुका कृषि अधिकारी किंवा उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाडीबी पोर्टल mahadbt.maharashtra.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.