सोन्याच्या गिन्नी विकण्याचे आमीष दाखवुन नांदगाव खंडेश्वर येथे दरोडा

सोन्याच्या गिन्नी विकण्याचे आमीष दाखवुन नांदगाव खंडेश्वर येथे दरोडा
■ जैन पेट्रोल पंप समोरील घटना आरोपींचा शोध सुरु 

नांदगाव खंडेश्वर - 
अमरावती ग्रामिण जिल्हा पोलीस विभागाचे कार्यक्षेत्रातील नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दितील जैन पेट्रोल पंप समोर दिनांक 17-6-2025 चे 16/30 वाजता ते 17/00 वाजताचे दरम्यान सोन्याच्या गिन्नी विकण्याचे आमीष दाखवुन फिर्यादी पदमिना प्रताप भरणे वय 38 वर्ष राहणार सारखनी तालुका किनवट जिल्हा नांदेड यांना मारहान करुन नगदी रोख रक्कम 300000 रु जबरीने घेऊन आरोपी 1) शाम आनंदराव राखडे 2) अश्विन उर्फ दिपक दोन्ही राहणार गोंडवडसा तालुका किनवट जिल्हा नांदेड व अनओळखी 3 ते 4 ईसम चारचाकी वाहनाने पळुन गेले फिर्यादीचे तक्रार वरुन नांदगाव खंडेश्वर पोलीसांनी गुन्हा नंबर 190/25 कलम 310 (2) बी.एन .एस.395 प्रमाने गुन्हा दाखल करुन तपासात घेतला आहे.या घटनेचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार किरण औटे यांच्या मार्गदर्शनाखाली  पो.उ.नि.तुळजेवार ईत्यादी पोलीस पथक करीत आहे.