दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित
अमरावती-
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून वर्ष 2025साठी दिव्यांगजनांच्या सशक्तीकरण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज आंमत्रित करण्यात आले आहेत. सदर पुरस्कारांकरीता अर्ज, नामांकन सादर करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल दि. 15 मे ते 15 जुलै 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
अर्ज, नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in वर भरण्यात यावे. नामांकनामध्ये पोर्टलवर उपलब्ध प्रारूपमध्ये निर्दिष्ट सर्व प्रासंगिक विवरण समाविष्ट असावेत, 1 उल्लेखनीय आणि प्रेरक कामगिरींना स्पष्टपणे समाविष्ठ करावेत. तसेच कामगिरींशी संबंधित सहायक दस्तऐवज अपलोड करावेत.
भौतिक स्वरूपात किंवा कोणत्याही अन्य स्वरूपात प्राप्त अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. पात्रता निकष आणि इतर विवरणाकरिता विभागाची वेबसाईट depwd.gov.in तसेच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in यावर उपलब्ध आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड यांनी केले आहे.