मोर्शी -
मोर्शी पोलिस स्टेशनला ठाणेदार म्हणुन पोलिस निरीक्षक सुरज बोंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानीं मोर्शी पोलिस स्टेशनचा कारभार हाती घेतला आहे. त्यांच्यासमोर शहरासह ग्रामिण विभागातील कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालून गुन्हेगारी प्रवृत्तींवर धाक निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. सुरज बोंडे हे यापुर्वी
चांदूर बाजार सारखे पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष व दबंग ठाणेदार म्हणुन कार्यरत राहिले असून त्यांनी तिथे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालत अवैध जनावरे वाहतुक , जुगार , चोर्या, लुटमार आदी गुन्ह्यांच्या उकल करत आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हेगारांचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
नविन आलेल्या अधिकार्यांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी नागरीकांची अपेक्षा वाढली आहे. गुन्यातील प्रकरणांमध्ये विशेष तपास करून आरोपींना जेरबंद करण्यामध्ये पुर्ण पणे लक्ष्य घालणारे सुरज बोंडे मोर्शी पोलिस स्टेशन कसे हाताळतात या कडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे.
गुन्हेगारी कृत्य खपवून घेणार नाही - ठाणेदार सुरज बोंडे
पोलिस व नागरिक मित्रत्वाचे संबंध असले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करू. जास्तीत जास्त पोलिसिंग कसे राबवता येईल सोबतच अमरावती ग्रामिण पोलिस अधिक्षक साहेबांच्या आदेशाने “गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योजना आखुन कठोर कारवाई करण्यात येईल ” तसेच जिल्हा पोलिस प्रमुख देतील त्या आदेशानुसार नवनवे उपक्रम राबवत प्रथम प्राधान्य देण्यात येईल. मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीत अवैध जनावरे वाहतुक, जुगार, गांजा विक्री वाहतुक असले कोणत्याही गुन्हेगाराचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे कामे मोर्शी पोलिसांतर्फे करन्यात येतील , अशी ग्वाही पोलिस स्टेशनला रुजु झालेले नवे ठाणेदार बोंडे यांनी दिली.
मोर्शी पोलिस पोलिस स्टेशन विभागाअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तींची गय नाही – ठाणेदार सुरज बोंडे
कायदा आणि सुव्यवस्था अभेद्य राखण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल व नागरिकांना सुरक्षितता वाटेल. मोर्शी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरी व ग्रामीण भागातील गावे पोलिसांशी संपर्कात असतील. शहर व ग्रामीण दोंन्ही क्षेत्र समतोल राखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक रहावा. यासाठी कडक कारवाई केली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असी माहिती मोर्शीचे नवनियुक्त ठाणेदार सुरज बोंडे यांनी सांगीतले आहे.