मम्मी गेली...!' १४ वर्षीय मुलीचा काळीज पिळवटून टाकणारा अकात

'मम्मी गेली...!' १४ वर्षीय मुलीचा काळीज पिळवटून टाकणारा अकात

कल्याण -
कल्याणमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. एकाच कुटुंबातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका मुलीला रेस्क्यू करण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.  या मुलीच्या आईचा दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची माहितीसमोर आली आहे.
कल्याण पूर्वमधील मंगलराघोनगर परिसरात  मंगळवारी दुपारच्या सुमारास ही  घटना घडली.  या भागात असलेल्या सप्तशृंगी को ऑपरेटिव्ह सोसायटी नावाची ४ मजली इमारत आहे. या इमारतीच्या  तिसऱ्या मजल्यावर दुरस्तीचं काम सुरू होतं. पण दुपारच्या सुमारास अचानक या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब कोसळल्यानंतर थेट तळमजल्यापर्यंत येऊन आदळला. इमारतीच्या मध्येच ही घटना घडली. त्यामुळे पहिल्या आणि तळ मजल्यावर घरात राहणारे कुटुंब ढिगाराखाली दबले. या दुर्घटनेमध्ये एक १४ वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली. पण या दुर्घटनेमध्ये चिमुरडीच्या आईचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 'मम्मी गेली...' असं ती रडत रडत सांगत आहे.