महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रोटोकॉल (SOPs) व अंतर्गत सुधारणा संवाद बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रोटोकॉल (SOPs) व अंतर्गत सुधारणा संवाद बैठक संपन्न 


मुंबई -
आज विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा. उपसभापती डॉ. Dr. Neelam Gorhe  यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रोटोकॉल (SOPs) व अंतर्गत सुधारणा या विषयावर एक विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आयोगाचे माजी अध्यक्ष, माजी सदस्य, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या आयोगाच्या कामकाजाबाबत सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.

महिला आयोगाच्या कार्यक्षमतेसंदर्भात आपले अनुभव, अडचणी, व अपेक्षा यावेळी मी मांडल्या व महिला अत्याचार प्रकरणांची प्रभावी हाताळणी होण्यासाठी केवळ कनिष्ठ नव्हे तर DCP व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही संवेदनशीलता, कायदेशीर प्रक्रिया व "मनोधैर्य योजना" संदर्भात विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याची ठाम मागणी केली.

या चर्चेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे  , महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मा. अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार  चित्रा वाघ ,शीतल मुकेश म्हात्रे  , शिंदे  ,अंजली दमानिया , संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह महिलांसाठी कार्य करणाऱ्या माझ्या महिला सहकारी उपस्थित होत्या.